पावसाळा…!

पावसाच्या आगमनाचा गोडवाही काही वेगळाच असतो.  एक प्रेमी युवक आपल्या प्रेमिकेची आतुरतेने वाट बघत असतो… तिच्या भेटीला आतुरलेला असतो आणि नेमक्या अशावेळीच तिला यायला उशीर होतो… तेव्हा त्याची होणारी चिडचिड असाय्य करुन सोडणारी असते.

त्याचप्रमाणे या तीव्र उन्हाच्या वेळी पावसाच्या सरीचा स्पर्श प्रत्येकालाच हवासा वाटतो… प्रत्येकजण आकाशाकडे नजर लावून असतात. मग तो शेतकरी असो किंवा नोकरदार असो.

चातकाची पण तहान त्या पहिल्या पावसाची असते. एवढेच नाही तर पक्षी, प्राणी यांनाही हा पावसाळा खुणावत असतो.

पहिला पाऊस कधीच एकटा येत नसतो. जशी ती त्याला भेटायला येताना आपल्या एक-दोन मैत्रिणींना या भेटीची कल्पना देवून किंवा सोबत घेवून येत असते आणि नियोजित स्थळी पोचल्यावर त्या मैत्रिणी नकळत मागच्या पावलांनी परत जात असतात, अगदी तसंच सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट घेऊन पहिला पाऊस आपल्या भेटीला येत असतो.

जशी ती मैत्रीण आपल्या मित्रासोबत गप्पा मारण्यात गुंतलेली, एकरूप झालेली असते तसंच सोसाट्याचा वारा आणि विजेंच्या कडकडाट्याला सोडून आपल्यासोबत तो धो धो कोसळत असतो. तिच्यातील लाजरेपणा हुबेहूब या पावसातही जाणवत असतो.

आकाशाला काळ्या ढगांनी गवसणी घातलेली असते. सगळीकडे वातावरणात थंडीची चाहूल येऊन हवेतील गारवा जाणवू लागलेला असतो… आज येईल उद्या येईल असं म्हणता- म्हणता तोही लपाछपी खेळत असतो. आणि एकेदिवशी आपण बेसावध असतानाच नकळत भूतलावर थयथयाट करत कोसळतो.. मग मात्र सगळ्यांचीच पळापळ सुरु होते..

‘बेसावध असतांना नकळत कोसळणाऱ्या सरी मनाची चांगलीच तारांबळ उडवून टाकतात.  कामाच्या रगाड्यात गुंग असलेल्या खुल्या डोळ्यांमधून पावसाचं अस्तित्व निरखू लागतं.’

कुणी वाळत घातलेले कपडे गोळा करण्यात गुंग असतात.. कुणी दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या चीजवस्तू आत घेण्यासाठी धावपळ करत असतात.. कुणी लहान मुलांप्रमाणे पावसाशी खेळत असतात… कुणी रस्त्यावर दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहात नाचतांना बालपणीतील दिवस जागवत असतात… कुणी छत्र्या तर कुणी रेनकोट शोधत असतो… कुणी घराच्या छपरातून घरात ठिबकणाऱ्या पाण्याला थांबवण्यात व्यस्त असतो… तर कुणी दुरूनच पहिल्या पावसाच्या आठवणी जाग्या करीत असतात…

‘प्रत्येकजण मिळेल ती संधी साधुन पावसाशी आपलं भावनिक नातं जोडत असतो आणि त्या पावसात एकरूप होवून आनंद लुटत असतो…..’

कित्येकांच्या आठवणी पण या पावसातच जिवंत होतात. एखाद्या नात्याच्या विरहात हा पाऊसच सांत्वन देतो. काहीवेळा तर अश्रू लपवण्यासाठी पण मदत करतो.

“ऋतूचक्र पण काय मस्त आहे ना…,”
उन्हाळ्याचे चार महिने कडक ऊन सोसल्यावर येणाऱ्या‌ पावसाचा आनंद काही वेगळाच असतो. अगदी मनाला स्पर्श करणारा. शेतकऱ्यांच्या डोळ्यांच पाणी जेव्हा संपते तेव्हा पावसाचाच आधार त्यालाही वाटतो. ” कमी पडला तर दुष्काळ, जास्त पडला तर महापूर…” आणि नेमक्या याच कारणामुळे कित्येकदा तो आत्महत्येला बळी पडतो.

‘आपल्या आयुष्याचही असंच नाही का वाटत?’
मेहनतीचे काही दिवस सहन केल्यानंतर मिळणाऱ्या ‌ यशाचा आनंद काही वेगळाच असतो. ‘आपण अपयशी ठरलो’ म्हणून कित्येकजण प्रयत्न करणे सोडून देतात , पण खरंतर त्यांच्या आयुष्यात लवकरच सुखाचा पावसाळा येणार असतो..

पावसाला अर्थही तेव्हाच प्राप्त होते,जेव्हा उन्हाने अंगाची लाही लाही होते. आणि पाठ पोळून निघते..!!!!

“खरंच पाऊस म्हणजे निसर्गाची फार मोठी देणगीच म्हणावी लागेल.” अगदी मनाचा राजाच जणु, मनात आलं की मनसोक्त बरसतो, रूसलच तर तोंड सुद्धा नाही दाखवत ; जणु आपल्या मनातील सुप्त भावनांची प्रतिबिंब.

29 thoughts on “पावसाळा…!

 1. Well done Blogger🔥
  Heart touching description of mansoon ⛈️
  & How important✨ it is…..
  Like this……..
  Overall It was Amazing 💯 article I cheers🌠 U for UR Next article⚡

  Like

 2. To be honest, I don’t think you will be a bloger one day .. how beautifully manage a thoughts of urs on monsoon (पाऊस ) it’s absolutely good …very well done Durga !…✌️👍..
  KEEP
  IT
  UP 👌….

  Like

   1. … काही हरकत नाही. पावसाळा सुध्दा वर्षभराच्या कालावधी नंतरच येतो. 😁😀

    Like

 3. फारच छान!!. पाऊस आणि सामान्य माणसाच्या नात्याचं हुबेहूब वर्णन लेखिकेने केले आहे.
  Keep it up. We’ll awaiting for more stories…

  Like

 4. खुप सुंदर।।।।
  तुझ article वाचत आहे आणि चक्क दारासमोर पाऊस पडत …😊
  आणि मी तेवढ पावसाला अनुभवत आहे…. Keep it up😊

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s