वळण

येशील का तू त्या वळणावर
जिथे नेईल माझा रस्ता
ऊन वारा सोसत, वादळे झेलत
अंगावरी शहारे जणु भासता

थांबता वाटेत हलकीच यावि आठवण तुझी
विसरून जावे भान सारे अन् माझीच मी

दरवळणारा हा वारा सांगतो मज रमुनी
करुया गंमतजंमत असेच कधितरी मिळुनि

पाहता आकाशाला वाटे भावनांचे विशाल सागर
नको ते ओझे आठवणींचे घेऊनी या मनावर

आठवूणी प्रसंग त्या डोंगरदऱ्यांपलिकडले
ताऱ्यांत दळलेल्या इच्छा अन्
सोबतीला घातलेले सुखद क्षण सावलीतले

आयुष्याच्या रंगांत उधळुनी अनेक रंग
दुःखाच्या सरीत अश्रुंनी भिजत
सुखाच्या लहरीत आनंदाने रमत
होऊनी आता गुंग

कधी वाटे जाणावे रहस्य त्या वळणाचे
जावे जिथे ठाऊक नसेल हास्य ह्या जिवणाचे

अनुभवाया नव्या जुन्या स्मरणीय आठवणी
ओढ लावूनी जिवा ध्यास उरली आता मनी‌

जाता जाता जावे दूर जिथे संपेना पायवाट
हवेहवेसे तुझे असने नको साऱ्यांची किलबिलाट

चाहूल आहे जायची आता त्या वळणावर
येशील का तू त्या वळणावर
येशील का तू त्या वळणावर…

17 thoughts on “वळण

Leave a reply to Vaibhav datta ajagar Cancel reply