आठवण

न सांगताही मनात येते
अस्तित्व जाणवून द्यायला
देवून जाते कधी हास्य
तर कधी रडवायला

कुणाची तरी वाट पाहणं
पुन्हा त्याच गारठलेल्या वाटेवरून
अधीर पाऊले चालू लागतात
आठवणींची जुनी शाल पांघरून

अस्वस्थ रात्र‌ ऊलटते
दूर अनावर पहाट उमटते
क्षणभर मन सूखावते
सोबतीने हुरहुर दाटते

आठवण एक अबोल स्पंदन
स्मरण होईल ज्याचे
विसर पडेल साऱ्यांचा
ध्यानी विचार रहावे त्याचे

माणसं येतात माणसं जातात
नाती अनेक जुळतात
कित्येक दिवस अशीच सरतात
आयुष्यात शेवटी आठवणीच उरतात

11 thoughts on “आठवण

  1. Wow!😊 feeled pleasent☺️.
    Liking more and more your words everytime you post🖋️.
    I appreciate that.
    Memories✨ bring back everything We lost.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s