मी आणि गर्दी

उभं राहून बघत होते समोरच्या जगात ,त्याच माझ्या आवडत्या गच्चीच्या कोपऱ्यातून जिथून बाहेरच्या जगाच अस्तित्व मनसोक्त निरखता येते.

कुठेतरी वाचलं होतं,
” माणूस एकटा असला कि हरवतो “


त्याच्या जुन्या आठवणीत मग त्या चांगल्या असो वा वाईट त्याच्या भुतकाळात‌ ,भविष्याच्या स्वप्नांच्या विचारांत तर कधी सध्याच्या स्थितीत जे चाललंय त्याचा अर्थात वर्तमानाचा. खरंतर जुन्या आठवणी कधी कधी नकोश्या वाटतात कारण आपण त्यावेळी घेतलेले काही निर्णय चुकीचे असतात पण त्यात आपणं चुकीचे नसतोच ते निर्णय त्या त्या वेळच्या अक्कलेनुसार असतात आणि त्या वेळेपर्यंतच मर्यादित असतात. पुढे आपण मोठे होतो. अक्कल बदलते आणि अनुभव देखील येतात.

पण गर्दीत हरवायला होतं नाही, खरंय का ते ?

पण कधी कधी असं वाटतं की आपण स्वतःलाच हरवून घेत असतो या गर्दीत !

गर्दी … कसली?
माणसांची, गाड्यांची, विचारांची, आचारांची ,Compition ची, करिअरची, गरजांची, पैस्याची ,अपेक्षांची , स्वप्नांची, दारिद्र्याची, श्रीमंतीची, संसाराची….
गर्दी …,गर्दी …., गर्दी …..अरे काय ही गर्दी ……?????
अशा एक ना अनेक गोष्टी गर्दीच्या स्वरुपात आपलं आयुष्य व्यापून टाकतात आणि जगण्याचा एक भाग निर्माण करतात…
खरंच आपण स्वत:लाच हरवून बसलोय का गर्दीत ?
आज एकटं राहायला वेळ कुणाला आहे ? कुठल्या ना कुठल्या  form मध्ये आपल्या भोवती ही गर्दी आहेच.

या विचाराने मी ही भटकली, आता एकटी असुनही मी देखील कुठेतरी हरवलीयं , असं वाटायला लागलं होतं. आता असो ,आज कॉलेज जायचयं, Journals सबमिशन आहे. संध्याकाळी प्रॅक्टिस आणि बस स्टॉप , बैलजोडी परिसर कडुन एक चक्कर , सोमवार पासून Regular Routine …, मोजकीच झोप (झोपेचं म्हणाल तर पूरेपूर घ्यायलाच हवी पण Hostel म्हटलं की ग्रूपमधली मौजमजा आलीच. झोपायला कधी रात्रीचे १_२ वाजतात कळतही नाही.)
कॉलेज, प्रॅक्टिस,‌ करून यायला सांगितलेला अभ्यास‌ , एक भावी डॉक्टर म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदललायं , जबाबदारी वाढलीयं ,गरजा वाढल्यात…. घर, कॉलेज, मित्रमैत्रिणी, Past Life , Current Life … गर्दी आहेच . मी एकटी कुठेयं (तुम्ही) …?

माणूस एकटा जन्माला येतो पण मरतांना गर्दीतच.
किंबहुना या सगळ्या गर्दीत तो कधीच मेलेला असतो… स्वत:साठी ! तो जगतोय नान्हा तऱ्हेच्या गर्दी साठीच. जन्माबरोबर मिळालेला देह घेऊन.
या गर्दीची खरंच गरज आहे…?
बहुतेक नाही….

माकड आणि वाघ …माकड माणसाळली , त्यांनी गर्दीशी जवळीक केली. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला. पण वाघ जंगलातच, गर्दीपासून दूर. आता उरलेत बोटांवर मोजण्याइतके. बहुतेक निसर्गाचा नियमच असावा हा,
गर्दीतच राहा”. ज्याने पाळला तो तग धरून आहे.
थवा ,कळप ,झुंड , समुदाय…जे ह्यात मिसळले ,ते जगत आहेत.
मी जेव्हा पुस्तकांच्या गर्दीत होते ( अर्थात आताही आहेच) तेव्हा वाचलं होतं “Survival of the fittest”
Darwin म्हणतो ,Survival of the fittest is a metaphor for better adapted for immediate local environment
ज्याने बदल स्विकारला, अनुभवला, आपलासा केला आणि बदलला, तो वाचला. त्याच अस्तित्व टिकून आहे.

आता विचारांची गर्दी झाली होती माझ्या डोक्यात.
खरंतर कधी कधी  खूप मोठा प्रश्न पडतो
” गर्दी आपल्यासाठी की आपण गर्दीसाठी ?”
इतक्यात फोन वाजला.

तिकडुन मित्र:_ काय करतेयस, अजूनही Hostel वरच ,१०:४५ वाजून गेलेत , कॉलेजला येत नाहीयेस का ? आवर ,ये मग बरीच सबमिशन बाकी आहेत ,येतांना तुला Notes घेऊन यायचे आहेत, Drug Sheet पण..ए तू सायलीला फोन केलाय का ग ? कालच म्हणाली होती फोन कर म्हणून, तू पण ना

मी :_ अरे हो हो………

मी स्वत:लाच :_ हो आलीच ,Return पुन्हा त्या गर्दीत… कामासाठी, कॉलेजसाठी , मित्रमैत्रिणींसाठी ,Survival साठी , उद्याच्या स्वप्नपूर्तीसाठी, पुन्हा एकट्यात न जाण्यासाठी…………

आलीच$

13 thoughts on “मी आणि गर्दी

  1. Incredible 🔥
    I was pretty lost during reading.
    But phone in Article disturb Your thoughts……& Ended up my joy of reading.
    Waiting ….to next one😇

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s