आई

अ,आ,..आई या शब्दापासून आपली बोलायला सुरुवात झाली . मग हळूहळू त्या शब्दकोशात भर पडली . लहाणपणी आई झोपतांना चांदोमामा दाखवायची . आईच्या कुशीत ब्लॅंकेटहून जास्त उब होती .डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत खरंच खूप जिव्हाळा होता. लहानपणी आई शाळेसाठी तयारी करून द्यायची. छोट्याशा बूटांची लेस सुटलेली असेल तर ती बांधून द्यायची. असं  करत तिने मला लहाणाच मोठं केलं. सांभाळ केला. बालपण तर गेलय आता पण त्या गोड आठवणी तर अजूनही मनात कायमचं घर करून आहेत…

आईचे संस्कार आणि प्रेम‌ हेच आपल्यासाठी आशिर्वाद असतात…., पुढे जाऊन ते आपल्या कामात ,कर्तुत्वात दिसतात. खरं सांगायचं तर आईने वेळ पडली तर चापटही दिलंय पण आईचा हेतू अगदी Clear असायचा . हा त्यावेळी काही वेळासाठी राग येणारा असायचा पण आज कळतंय की आपल्या मुलांचं काहीही वाईट होऊ नये त्यांनी चुकीच्या वाटेवर जाऊ नये ह्यासाठी ते असायच पण  त्यातही आईचं  किती प्रेम होत ना..
या जगात चुकीला माफी नसतेच पण आई एकमेव अशी व्यक्ती आहे जी आपल्या सर्व चुका माफ करते.
आईच्या चेहऱ्यावरची Smile बघितली की Smile येते , आईचं दुःख हे आपलं दुःख असतं जसं आपलं तिच्यासाठी असताना अगदी तसंच ..
आईबद्दल जितकं लिहावं आता तितकं कमीच आहे .
कारण ती खरंच मनाने खुप सुंदर, प्रेम करणारी , काळजी करणारी , सांभाळून घेणारी, पाठिंबा देणारी असते आणि  माझ्या आईचे व प्रत्येकांच्याच आईचे व्यक्तिमत्व हे असंच असते  …

@प्रतिलिपी
_माझी आई.20/08/2020
~Durga Jarate

7 thoughts on “आई

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s