तुला पाहताच क्षणी

प्रत्येकांच्या आयुष्यात अस‌ कुणी ना कुणीतरी असते. त्या व्यक्तीला पाहताच क्षणी  काहीतरी वाटते किंवा नकळत वाटुन जाते . कधीतरी झाले असेलच ना असे. हो ना ?आठवली ना ती व्यक्ती ?

तुला पाहताच क्षणी…

तुला पाहताच क्षणी असे वाटले
काय ते  माझे मलाच नाही कळले

आकाशाचे रंगही बदलेले
चेहऱ्यावरी भाव ते उमटलेले

फुलांचा रास वाटला वेडा
दवाचा भास झाला थोडा

तहानलेल्या पाण्याची आस होती जशी
पूर्ण झाली तहान माझी त्याक्षणी तशी

वाऱ्याच्या गंधाची साथ होती
ठाऊक नसलेली ही वाट होती

येण्याने आनंदाचा वर्षाव झाला
नवी दिशा मिळाली जीवनाला

मुक भाषेचे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचले
जेव्हा अबोल असे मन बोलले

किती हे‌ मन तुझ्यात रमले
तुला विसरणे मला नाही जमले

आठवणींनी आता जीवन भरले
तुझ्या आनंदाच माझे आनंद उरले

नकळत ती वाद झाली
जगण्याला नवी प्रेरणा मिळाली

आकर्षक होता तो रूसवा
म्हणूनच वाटला हवाहवासा

सुरू होण्याआधी संपली कहाणी
साथीला उरलं केवळ डोळ्यात पाणी

हे स्वप्न समजून मी विसरले
वाट निवडतांना भान हरपले

पण तुझे जाणे हे कायमचे नाही तर
सुर्य अस्ताला जातो परत येण्यासाठी
तसेच तुझे हे जाणे झाले

खरंच रे तुला पाहताच क्षणी असे वाटले
पण काय ते माझे मलाच नाही कळले…….

14 thoughts on “तुला पाहताच क्षणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s