जेव्हा मी सायकल शिकले



सायकलशी गट्टी बालपणीच झाली
उत्सूकतेने जेव्हा मी सायकल शिकले
कुठेही जायला मला सोबती मिळाली
म्हणुनच तेव्हा मी तिला खूप जपले

विनाकारण फिरायलाही मस्त वाटायचं
नवीन जेव्हा मी सायकल शिकले
पडल्याने लागल्यावर परत उठायचं
पण फिरण मात्र मी कमी नाही केले



आपल्यापेक्षा लहानांना सायकलवर फिरवलं
नवीन जेव्हा मी सायकल शिकले
खूप छान आनंद यातून मिळवलं
पण त्यांनाही पडल्यावर मात्र बोलणे ऐकले

आईच्या रागवण्याला दुर्लक्ष करून
जेव्हा मी सायकल परिपूर्ण शिकले
बाबांच्या धाकाला थोड जपून
कितीतरी ठिकाणी मी फेरफटका मारले

सायकलने मैत्रिणींसोबत शाळेत जायचे
कधीतरी डबलसीट चालवून
रेसिंग स्लो सायकल असे खेळ व्हायचे
टिकून राहायचं तिथे ब्रेक अावरून

स्वतःचा खूप अभिमान वाटला
बालपणी जेव्हा मी सायकल शिकले
कधी वेगाने कधी हळू रस्ता गाठला
जेव्हा मी सायकल शिकले

@Pratilipi 03/09/2020
~Durga Jarate

4 thoughts on “जेव्हा मी सायकल शिकले

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s