शाळा [ काहीस बालपणीतल]

शाळा आयुष्यातली एक अविस्मरणीय आठवण आहे. काही क्षण आणि आठवणी कधीच विसरता येत नाहीत शाळा अगदी त्यातलीच एक आहे .मग शिक्षक, मैत्रिणी, मित्र ,मस्ती ,अभ्यास ,खेळणे ह्या सर्व गोष्टीही आल्याचं..
शाळेत असताना आवडीचे शिक्षक म्हणजे तसे सर्वच होते पण जे punishment देत नव्हते ते शिक्षक आवडायचे कारण जे शिक्षक punishment द्यायचे त्यांची भीती वाटायची… चला तर मग बघुया थोडस शाळेतलं , बालपणीतल….

बनवुन नाव सोडायचे पाण्यात
म्हणत येना रे पावसा जोरात
साचलेल्या पाण्यात पाय बुडवून खेळायचे
सोबतीचे सोडून कशाचेही भान नसायचे

आईने कितीही आवाज दिला तरी
बेफिकीर दुर्लक्ष करायचे
बाबांच्या गाडीच्या आवाजाने मात्र
पुस्तक उघडून बसायचे

उन्हाळ्याच्या सुट्ट्या जायच्या गावे फिरण्यात
पुढच्या वर्गात जायची हुरहुर असे मनात
नवीन पुस्तके वह्या दफ्तराने नवी सुरुवात
ती चर्चाच नसायची मस्करी नाही ज्यात

एका डब्यात असायचे पाच_सहा तरी हात
अधुनमधून चॉकलेट पिपरमेंटची साथ
रोज वाटे शाळेची सुट्टी होऊ नये
सुट्टीला खेळायला वेळही पुरत नसे

नवीन मित्रमैत्रिणी बनवण्याचा असायचा जणू छंद
गट्टी जमल्यावर आपल्याच मौजमजेत धुंद
कट्टी झाल्यावर असायचा थोडा अबोला
बोलण्याच्या प्रयत्नात दुसऱ्यांवरून मारायचा टोला

कित्येक अशा आठवणी राहिल्या मनात
कधी येतील ते दिवस परत आता जीवनात
बदलता यावेत जीवनातील काही वर्ष
जगता येईल पुन्हा नव्याने घेऊनी हर्ष

बालपणीच्या त्याच मित्रमैत्रिणींसोबत
मंद पावलांनी शाळेची पायवाट गाठत
जिथे आईवडीलांइतकेच प्रेम आणि धाक
दाखवणारे शिक्षक होते
बाहेर पडल्यावर कळलं
विद्येच्या मंदीराचे आणि आपल्याला घडवणारे
तेच तर खरे दैवत होते

6 thoughts on “शाळा [ काहीस बालपणीतल]

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s