समुद्रकिनाऱ्यावची संध्याकाळ

फिरत फिरत समुद्र किना-यावर गेले तांबुस पिवळा मावळता सुर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या, जमेल तेवढं पुढे गेले, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छानपैकी उसळुन अंगावर येत होते, त्यांची खारट चवओठांवर जाणवत होती. सांजवारा पण हलकेच बोचरा होऊ लागलेला… पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते, पण असं का वाटत होतं सुर्य अस्ताला जायला आज उशिर करतोय…?

“संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली,
त्यालाही कळलं मला तुझी आठवण आली!”   

 स्वाभाविक आहे, अश्या रम्य वेळी त्याची आठवण येणारच, निसर्गच तो, आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्र सत्य. अशा समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दुरवरून येणारा मातीचा दरवळ येऊ लागला की आपसुक आठवणी जीवंत होऊ लागतात. पावसा सोबत आमचं खुप प्रेमळ नात आहे, किंबहुना प्रत्येकाच तसं असतंच…

मग तो आला तर एकटा कसा येईल?
त्याला सुद्धा आठवण करून देईल…!
“नक्की ढगांनी केली असेल सरींची पाठवण?
आली असेल का त्यालापण माझी आठवण?”     

पाऊस पडायला लागला कि सारं कस मस्त, प्लेझंट, वेगळच हव हवंस वाटायला लागतं. पावसानं याव, धुवांधार बरसावं

आणि हो, अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व तीनं स्वतःची विसरून यावी! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल,
सरींच काय! त्या येतात धरणीच्या ओढीने…   केंव्हा तरी परीस्थिती गडबड करते, तीचं किंवा त्याच नसणं, जास्त बोचरं भासतं, एकटेपणाचं वाटतं. मग मन कशातच रमत नाही, मग उगीच छातीत धडधडायला लागतं, पण चेह-यावर ते न दाखवता चटकन तिथुन सटकायचं. शरीराने पळायचं खरं, पण मनाचं काय?

ते तर केंव्हाच ट्रांन्स मधे गेलेलं,
आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं…

दोन्हीकडे तीच परीस्थिती, कुणी कुणाला समजवायच? पण ते शक्य नसतं.
उरत फक्त परस्परांसाठी झुरणं…
कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं…
“कधी चिंब पावसात आठवणींच्या भिजायची सवय लागते मग एकमेकां साठी झुरायचं!”     
पाऊस मग दरवर्षी येतच राहतो, ॠतुचक्रा सोबत जीवन चक्र पण चालत रहातं .

2 thoughts on “समुद्रकिनाऱ्यावची संध्याकाळ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s