क्षण मंतरलेले

वेदनेच्या उन्हात जीव नकोसा होतो
तांदळातला खळा निवडून घ्यावा
आणि अलगद जसा फेकून द्यावा
तसंच या संसाराला फेकून द्यावसे वाटते
लहर येते आठवणींची आणि डोळ्यासमोर
येतात ते क्षण मंतरलेले…….!

किती गोजिरे होते ते दिवस
न राहवून तासंतास केलेल्या गप्पा
कधी अनुभवला पाऊस उन्हातला
तर कधी जाणला भाव मनातला
आज उंचावत आहेत कल्पनेचे आसमंत
ओळखलेल्या प्रेमाचे किती रंग किती तरंग
ऐकलेली ती स्पंदणांची रूमझुम
मित्रमैत्रिणी होते जणू गुलाबाची कळी
तर कधी चमेलीची घुमघुम
अनोळखी सुन्या वाटेवरून चालतांना
कुणीतरी पैजणांची छमछम ऐकवून
डोळ्याची पापणी उघडण्याआधी गायब व्हावं
तसंच जागा करून आयुष्य विचारतोयं
येतील का ते क्षण मंतरलेले…….!!

कोवळ्या मनाच्या तुफान भावना
स्वप्नांचे असंख्य पाळणे
नाजूक हृदयाने निवडलेली मोठी स्वप्ने
हा तर शोध होता भविष्याचा
एक थांबा नागमोडी वळणावरचा
खेळ ठरला त्या चोरट्या नजरेचा
उधळलेल्या रंगासारखे क्षण विखुरलेले
पावसाच्या सरीने चिंब भिजून वाहिलेले
कुणी आणुन द्याल का ते क्षण मंतरलेले
आज पुन्हा हवेहवेसे वाटत आहेत
ते क्षण मंतरलेले……..!!!

__ Durga Jarate__
21/09/2020

2 thoughts on “क्षण मंतरलेले

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s