मागे वळून बघतांना

मागे वळून बघतांना…
काही चुकांना सुधारावे वाटते
नको असलेले क्षण आठवून
कधी पश्चातापाने जिव्हारी टोचते

मागे वळून बघतांना…
घोंघावणारे वादळ मनी उठते
दुरावलेल्या नात्यांना पुन्हा बघून
असंख्य विचाराने आभाळ उरी दाटते

मागे वळून बघतांना…
अपयशातून बरंच काही शिकावे वाटते
आस सोडलेल्या मनाला समजावून
चाहूल ध्यासाची हृदयात साठते

मागे वळून बघतांना…
वाटते फुटलेल्या बांधाला थोडं बांधावे
खेळ चोरट्या नजरेचा खेळून
जणू परत माघारी जाऊन थांबावे

‌मागे वळून बघतांना…
निसटलेले क्षण जीवास खेटते
जरासे घाव शब्दांनी घालून
ओस पापण्यांवरची डोळ्यांत मिटते

            ~Durga Jarate
@Wordpress_SeaofthewordS
              08/04/2021
                       

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s