चाहूल…!

गरजत्या नभातून
पावसाची सर आली…
अन् त्याच क्षणी मला
त्याची आठवण झाली…

रिमझिमत्या थेंबांनी
झाली आसवांची भरती…
हा सुसाट वारा
फिरे त्याच्या भोवती…

विसावा ना डोळ्यांना
न नजर माझी लवती…
बरसणारे थेंब
जणु प्रेम गीत म्हणतीं…

पहिल्यांदा तुला बघुन
मन माझे बहरले…
आनंदाच्या पावसात तुझ्या
दुःख माझे ही वाहले…

न भिजताच आज
वाटले मी चिंब भिजले…
हात तुझा हाती घेता
गैसमजाचे वणवे विझले…

निस्तेज या देहाला
कंपनाचा भास झाला…
स्वप्नीच का दिसतो तू
एकचि ध्यास ह्या मनाला…

~Durga Jarate.11_06

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s