ती रात्र…!

ती रात्र….!

चांदणे राहिले
अपुरेच त्या मेघातले
गाणे राहिले
अधुरेच ह्या मनातले
का अवकाश डोळ्यांवरचे
घेऊन गेली ती रात्र
स्वप्न का ते अर्ध्यावरचे
भुलवून गेली ती रात्र

Continue reading “ती रात्र…!”

चाहूल…!

गरजत्या नभातून
पावसाची सर आली…
अन् त्याच क्षणी मला
त्याची आठवण झाली…

रिमझिमत्या थेंबांनी
झाली आसवांची भरती…
हा सुसाट वारा
फिरे त्याच्या भोवती…

Continue reading “चाहूल…!”

मागे वळून बघतांना

मागे वळून बघतांना…
काही चुकांना सुधारावे वाटते
नको असलेले क्षण आठवून
कधी पश्चातापाने जिव्हारी टोचते

मागे वळून बघतांना…
घोंघावणारे वादळ मनी उठते
दुरावलेल्या नात्यांना पुन्हा बघून
असंख्य विचाराने आभाळ उरी दाटते

Continue reading “मागे वळून बघतांना”

रंग तू….

रंग तू….
पांघरलेल्या ढगांचा
मावळत्या सुर्याचा
पडणाऱ्या अंधाराचा
तर मंद चंद्राच्या प्रकाशाचा
रंग तू….

रंग तू….
बेभान सुटलेल्या वाऱ्याचा
पसरलेल्या गारव्याचा
थंडीतील शेकोटीचा
तर बर्फातील उबेचा
रंग तू….

Continue reading “रंग तू….”

आयुष्य असंच जगायचं असतं

कितीही संकटे आले म्हणून
खचून जायचं नसतं तर
संकटांना सामोरे जायच असतं
आयुष्य असंच जगायचं असतं

यशाचा पल्ला गाठला म्हणून
आकाशात उंच उडायचं नसतं तर
पावलांना जमिनीवर टेकवून ठेवायचं असतं
आयुष्य हे असंच जगायचं असतं

Continue reading “आयुष्य असंच जगायचं असतं”

अंतर मनाचे

सोडून असा जाऊ नकोस लांब लांब
अरे वेड्या मना तू जरा थांब थांब

विचारांचे काहूर कसे माजले माजले
गोड बोलून क्षणात असे लाजले लाजले

विरहाने उदास कधी झालेले झालेले
आठवणींचे कल्लोळ उठून आलेले आलेले

Continue reading “अंतर मनाचे”

गप्पा

फ्रेंड सर्कलच्या गप्पा असतातच भारी
गोष्ट सांगायची येते सगळ्यांचीच बारी

गप्पांची मैफिल कशी काय रंगते
कोणता विषय कुठे जाऊन संपते

ग्रुपमधली धमालही  एक नंबर असते
गप्पांच्या नादात काहीच भान नसते

Continue reading “गप्पा”

क्षण मंतरलेले

वेदनेच्या उन्हात जीव नकोसा होतो
तांदळातला खळा निवडून घ्यावा
आणि अलगद जसा फेकून द्यावा
तसंच या संसाराला फेकून द्यावसे वाटते
लहर येते आठवणींची आणि डोळ्यासमोर
येतात ते क्षण मंतरलेले…….!

Continue reading “क्षण मंतरलेले”

रंग आयुष्याचे

नकळत सुखाची चाहूल लागता
अलगद दुःखही मागोमाग येतात
अन् बघता बघता हेच दुःख
नाजूक हृदयाला पोखरून टाकतात
असे हे रंग आयुष्याचे….!

Continue reading “रंग आयुष्याचे”